Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडडिझेल-पेट्रोल-गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केजमध्ये शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

डिझेल-पेट्रोल-गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केजमध्ये शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन


केज (रिपोर्टर) पेट्रोल-डिझेल आणि गॅसची दरवाढ सातत्याने होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दरवाढीच्या निषेधार्थ आज केज येथील शिवसेनेच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चूल मांडून मोटारसायकलला हार घालून पंतप्रधान मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.


गेल्या सात वर्षांमध्ये इंधन आणि गॅसच्या दरात दुपटीने वाढ झाली. ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. महागाई कमी करण्याचा वादा पंतप्रधान मोदी यांनी केला होता मात्र त्यांना या वाद्याचा विसर पडला. गॅसची नुकतीच दरवाढ झाल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केला जावू लागला. आज केज शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महिला शिवसैनिकांनी प्रतिकात्मक चुलीवर स्वयंपाक बनवत हार घालत केंद्र सरकारचा निषेध केला. या वेळी मनोरमाताई डोईफोडे, अरविंद थोरात, बाळू पवार, अशोक जाधव, अश्‍विनी बडे, अभिजीत काशीद, अभिजीत घाटूळ, सुग्रीव सक्राते, चंद्रकांत इंगळे, अशरफ शेख, पप्पू ढगे, ज्योतिकांत कळसकर, तात्या रोडे, सुधीर जाधव, अमोल चौधरी, शिवाजी बोबडे, ज्ञानेश्‍वर बोबडे, शिवाजी चौरे, राहुल गोळवे, साहेबराव शिंदे, दत्ता अंधारे, सुधीर ठोके, राहुल अंधारे, अमोल घुले, गब्बर शेखसह आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!