मुंबई (रिपोर्टर) आम्ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेची मदत करण्याचा प्रयत्न केल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि कमी झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. आत्ताच्या तुलनेत पेट्रोल डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितलं.
इंधन दरवाढीबद्दल पुण्यात माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले, पेट्रोल आणखी वाढणार कारण रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढतायत, म्हणून अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडर वापरणारा महिला वर्ग, सीएनजीवर चालणार्या गाड्या या सगळ्यांचा एक हजार कोटी टॅक्स माफ केला आहे. करोनानंतर अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाची वाढ केली नाही. उलट त्यातून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, शेवटी विकासही झाला पाहिजे, सरकारही चाललं पाहिजे.