पलटी झालेल्या भंगारच्या गाडीवर आणखी तीन गाड्या आदळल्या
बीड (रिपोर्टर) मांजरसुंबा रोडवरील कोळवाडी फाट्यावर रात्री एक वाजता भंगारचा ट्रक पलटी झाला. त्यानंतर याच ट्रकवर अन्य तीन वाहने आदळले असून या विचित्र अपघातात दोघे जण जखमी झाले. वाहने रस्त्यावर पलटी होऊन पडल्याने रात्रभर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी जावून वाहतूक सुरळीत केली.
भंगार घेऊन जात असलेली गाडी कोळवाडी फाट्यावर पलटी झाल्यानंतर याच गाडीवर सिमेंटचा ट्रक, आणखी एक गाडी अशा तीन गाड्या आदळल्या. यात दोघे जण जखमी झाले. ही सगळी वाहने रस्त्यावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बीड ग्रामीण ठाण्याचे वाघ, पी.टी. चव्हाण, मस्के यांनी घटनास्थळी जावून क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने बाजुला हटवले व वाहतूक सुरळीत केली.