केज (रिपोर्टर): केज नगरपंचायत अंतर्गत पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू लागली. शहरातील लोंढे गल्ली, शिंदे गल्ली, अजिजपुरा या ठिकाणी पाणी नसल्याने येथील महिलांनी पाणी पुरवठ्याबाबत निवेदन दिले हातेे, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने आज महिलांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. शहराच्या ठिकाणी देखील पाण्यासाठी हाल होऊ लागले. शहरातील लोंढे गल्ली, शिंदे गल्ली, अजिजपुरा या भागात पाणी येत नाही. पंधरा दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी येथील नागरिकांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात नगरपंचायतकडे निवेदन दिले होते. निवेदन देऊनही नगरपंचायतने दकल घेतली नसल्याने आज महिलांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जात नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला. नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रभारी असल्यामुळे ते पाण्याच्या संदर्भात तितके गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत नाही.