गेवराई (रिपोर्टर) मुख्य वीज प्रवाह करणा-या तारेचे घर्षण होऊन सेलू(ता गेवराई) शिवारातील तीन शेतक-याचा एकूण चार एकर उस जळुन खाक झाल्याची घटना रविवार (ता २७)घडली असुन, लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
आगोदरच तोड नसल्याने त्रस्त असलेला शेतक-यांचा ऊस फडातच वाळत चालला आहे.त्यातच शेतातून गेलेले वीजेचे पोल उसास घातक ठरत आहेत. रविवार (ता गेवराई) शिवारातील रामकिसन सोळंके(दोन एकर),निर्मला सोळंके(एक एकर)आणि विष्णू जाधव यांचा एक एकर यांचा शेतजमिनीतुन मुख्य वीज प्रवाह करणा-या तारेचे घर्षण होऊन या तीन शेतक-यांचा एकुण चार एकर ऊस जळुन खाक झाला.यामुळे या शेतक-यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.