Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडचांद्यापासून बांद्यापर्यंत पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार -अजित पवार

चांद्यापासून बांद्यापर्यंत पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार -अजित पवार


मुंबई (रिपोर्टर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार्जिंग स्टेशन्सच्या संदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन टाकणार असून चांद्यापासून बांद्यापर्यंत आता प्रत्येक पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन सुरू करावे लागणार आहे. केंद्र सरकारने तसं धोरण आखले आहे, असं अजित पवार म्हणाले. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते.


देशपातळीवर आता मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल विरहित वाहनांचे उत्पादन होत असून प्रदूषणाबरोबर लोकांचा खर्च रोखला जाणार आहे त्या अनुषंगाने राज्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन ची गरज भासणार आहे या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे ते म्हणाले पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन टाकणार असून चांद्यापासून बांद्यापर्यंत आता प्रत्येक पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन सुरू करावे लागणार आहे. अजित पवार पुढं बोलताना म्हणाले की, काल कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक झाली. नीरा डावा आणि नीरा उजवा कालवा जूनपर्यंत बंद होणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु पाणी आहे म्हणून आहे दिसेल तिथे कांडे दाबत बसू नका. ज्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे त्यांना आम्ही ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी लावलेला ऊस वेळेत गेला पाहिजे याची खबरदारी आम्ही घेत आहोत, असंही ते म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!