Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडअशोक डक यांना बंधूशोक रामराव डक यांचे निधन

अशोक डक यांना बंधूशोक रामराव डक यांचे निधन


माजलगाव (प्रतिनिधी) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक गोविंदराव डक यांचे मोठे बंधू रामराव गोविंदराव डक यांचे औरंगाबाद येथे सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २७ मार्च सकाळी ७:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे मृत्यू समयी त्यांचे वय ७४ होते त्यांच्या पश्चात पत्नी, ऍड. भानुदास डक, सुशील डक ही दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व नारायण डक, वामन डक, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक हे तीन भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी सात वाजता त्यांच्या पार्थीवदेहावर माजलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डक कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!