Monday, March 8, 2021
No menu items!
Home बीड ‘ते’ रहस्यमयी ३३ गुंठे बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समनापूर गावाची रहस्यमयी गाथा

‘ते’ रहस्यमयी ३३ गुंठे बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समनापूर गावाची रहस्यमयी गाथा

‘ते’ रहस्यमयी ३३ गुंठे
बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समनापूर गावाची रहस्यमयी गाथा
अंधश्रद्धापोटी जुने समनापूर अख्खे गावच त्या ३३ गुंठे जमीनपासून गेले लांब, जुन्या समनापूर गावात आजही त्या ठिकाणी घरे असल्याची चिन्हे; रिपोर्टरने लावला शोध
तब्बल ६५ वर्षापुर्वी जुने समनापूर गावातील ‘ते’ १९ कुटुंबीय एकाच रात्री गाव सोडून स्थलांतरीत झाले होते; जुन्या समनापूर गावात घडत होत्या रहस्यमयी घटना
गावात पाहुणा आला आणि मुक्काम केला की साप चावून होत असे पाहुण्याचा मृत्यू; लाघोपाट होत असलेल्या घटनेने ग्रामस्थ झाले होते हवालदिल
गावात पाहुणे येण्यास घाबरू लागले, गावात संभ्रमाचे वातावरण, अंधश्रद्धेपोटी गावात सोयरकी जुळेना;
समनापूर जुने गाव असल्याची अनेक चिन्हे आजही त्या ठिकाणी दिसतात, प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या संशोधनाचा विषय


काही ठिकाणी करणी-धरणी, भुत, प्रेत किंवा भितीची अफवा पसरवून आपले हित साधण्याचे होतात षडयंत्र; अंधश्रद्धेला बळी न जाता त्यांचे षडयंत्र हाणुन पाडण्याचे करा प्रयत्न
दहा वर्षापुर्वी जरूड येथील एका ग्रामस्थाने त्या ३३ गुंठे जमीनीवर घर बांधुन राहण्याचा केला होता प्रयत्न; त्याच्या घरी पण साप चावून झाला होता पाहुण्याचा मृत्यू, त्यानंतर त्याने ती जागा सोडली
त्या ३३ गुंठ्याच्या चोही बाजूने दुसर्‍या शेतकर्‍यांची शेती परंतू कोणीही त्या ३३ गुंठ्यात साधे अतिक्रमणही करत नाहीत, आजही त्या घटनेची दहशत कायम
जुने समनापूर गावातील भक्त ज्या हनुमान मंदिरात दिवाबत्ती लावत असे ते मंदिर आजही सुस्थितीत; ग्रामस्थ आजही करतात पुजापाठ


३३ गुंंठे जमीन समनापूर शिवारातील ११९ गट क्रमांकात असून सातबारामध्ये सरकारी गायरान असल्याची नोंद तर शेतवारमध्ये दावल मलीक साहेबांचे इनाम असल्याची नोंद
हमखास पडीक जागा किंवा गावातील एखादा वादग्रस्त शेत, प्लॉट अशा जागेसंदर्भात करणी,धरणीसारखे रचले जातात षडयंत्र; आजही अनेक वाडे खंडर झालेली दिसतात, अंधश्रद्धा निर्मुलन समितीची जनजागृतीची गरज
करणी,धरणी करणे, भूत, प्रेतवर विश्‍वास करून अंध विश्‍वासाला बळी जाणे असे अनेक प्रकरण अनेक वेळा समोर येतात. काही ठिकाणी ग्रामस्थ तर काही ठिकाणी पोलीस प्रशासन अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मदतीने अशा प्रकरणाला आळा घालतात.

परंतू अंधश्रद्धा ही पुर्वजापासून स्विकारलेली श्रद्धा असल्याने याच्यावर आजही अंधविश्‍वास केला जातो. पुर्वी अंधश्रद्धा विषयी जनजागृती नसल्याने अंधश्रध्देचा बोलबाला होता. ही अंधश्रद्धा गेल्या अनेक दशकापासून लोकांच्या मनात घर करून बसलेली आहे. यासाठी २०१३ पासून स्वतंत्र कायदा बनविण्यात आला आणि सर्वात मोठी भूमिका ती म्हणजे अंधश्रध्दा निर्मुलन समितीची राहिली. त्यांच्या जनजागृती मोहिमेमुळे अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला लोकांनी नाकारले. त्यातून बराच फायदा समाजात झालेला दिसून येतो. परंतू अंधश्रद्धा म्हणजे करणी, धरणी, भूत, प्रेतच नव्हे तर अनेक ठिकाणी चमत्कारी घटनाही होतात. या चमत्कारी घटनेकडे अंधश्रद्धा निर्मुलन समिती पाहिजे तसे लक्ष देतांना दिसत नाही. अशा घटनेचे अनेक उदाहरण समोर असून दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने घेतलेल्या आढाव्यात एका ३३ गुंठे जमीन व त्याचे रहस्य आजही रहस्यमयच आहे. अंधश्रद्धेपोटी अख्खे गावच स्थलांतरीत झाले. अशा घटनेची मात्र कुठे नोंदही नाही आणि विशेष म्हणजे प्रशासनाने किंवा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अशा घटनेला कधी उजाळा देतांना दिसूनही आलेले नाही. बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समनापूर गावाची ही रहस्यमय गाथा असून हा खर्‍या अर्थाने संशोधनाचा विषय आहे.

आजही त्या ३३ गुंठे जमीनमध्ये कोणीही अतिक्रमण करत नसून अंदाजे ६५ वर्षापुर्वी घडलेल्या घटनेची दहशत आजही कायम असल्याचे दिसून आले. नेमके या ३३ गुंठे जमीनमध्ये काय घडत होते? एकाच रात्री त्या ठिकाणी राहणार्‍या १९ कुटुंबीयांनी अचानकच ते का सोडले? कोणत्या कारणाने होत होते त्या ठिकाणी पाहुण्यांचे मृत्यू ? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असून त्यावेळी मात्र अंधश्रद्धेपोटी किंवा ज्या घटना घडत होत्या त्या घटनेच्या दहशतीपोटी त्या ग्रामस्थांनी चक्क गावच सोडून दिले आणि त्या जागेपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर त्याच नावाचे नवीन गाव स्थापीत झाले. या विषयी दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने जुन्या गावात व नवीन गावात जावून जुन्या माणसाच्या भेटी घेतल्या यातून अनेक प्रश्‍न उपस्थित झाले असून प्रशासनाने अशा प्रकारे झालेल्या घटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी करणी-धरणी, भुत, प्रेत किंवा भितीची अफवा पसरवून आपले हित साधण्याचे होतात. षडयंत्र, अंधश्रद्धेला बळी न जाता त्यांचे षडयंत्र हाणुन पाडण्याचे प्रयत्न करा, अंधश्रद्धेला बळी न जाता आपल्या व आपल्या गावाच्या हितासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. समनापूर गावातील सरपंच सुमन गोरे, माजी सरपंच दिलीप शेळके, श्रीहरी पाटील बुवा गोरे, कांता बन्सी शेळके, बाजीराव गोरे अशा अनेक ग्रामस्थांनी ही माहिती दिली आहे.


बीड तालुक्यातील समनापूर गाव बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यागावात ३३ गुंठे गायरान शिल्लक असल्याची माहिती मिळाल्यानंतर नेमकी ती ३३ गुंठे जमीन कोणाची आहे? या संदर्भात चौकशी केली असता ती जमीन समनापूर शिवारातील ११९ गट क्रमांकामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या जमीनीसंदर्भात अनेक किस्से ऐकण्यास मिळाले. सुरूवातीला अंधविश्‍वासाचा प्रश्‍न असल्याने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. परंतू त्या परिसरातील ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर हा विषय गंभीर असल्याचे दिसून आले. त्या ३३ गुंठे जमीनीमध्ये जुने समनापूर गाव वसलेले होते. त्या ठिकाणी जुने समनापूर गावात १९ घरे अंदाजे १०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ती समनापूरवस्ती म्हणून प्रसिद्ध होती.

तेथील ग्रामस्थ आनंदाने आपले जीवन जगत असतांना अचानकच एका घटनेने गावकर्‍यांचे लक्ष वेधले. त्या गावात पाहुणा आला होता. पाहुणा मुक्कामी राहिला, त्या रात्री पाहुण्याला सापाने चावा घेतला आणि पहाटे त्या पाहुण्याचा मृत्यू झाला. अशीच घटना काही दिवसापूर्वी पाहुण्यासोबतच घडली होती. पुन्हा ही घटना गावात चर्चेचा विषय झाली, पाहुणा गावात आला आणि त्या पाहुण्याने गावात मुक्काम केले की साप चावून त्या पाहुण्याचा मृत्यू होणार अशी ग्रामस्थांच्या मनात भावना तयार झाली. ही दहशत कायमच होती. पुन्हा अशीच घटना घडली, अख्खे गाव हैराण झाले. गावात सोयरीक जुळेना, भितीचे वातावरण पसरले.

ग्रामस्थांनी बैठक घेतली १९ कुटुंब जाणार कोठे? हा प्रश्‍न निर्माण झाला. पाहुणा म्हणून कोणी साथ देईना, अत्यंत भयंकर अवस्था त्या ग्रामस्थांची त्यावेळेस झाली. शेवटी त्या ३३ गुंठ्यापासून लांब ५ कि.मी.च्या अंतरावर असलेल्या डोंगरावर हे १९ कुटुंब उघड्यार जावून बसले. शेवटी भयभीत घटनेला घाबरून अंधश्रद्धेपोटी अख्ख्या गावाचे स्थलांतर झाले. जुने समनापूर गाव एकाच रात्री उजडले आणि नवीन समनापूर गावाची सुरूवात झाली. दिवस आले तसे गेले, लोकांना विसर पडत गेला परंतू आजही समनापूर गावात या घटनेची दहशत कायम असून त्या ३३ गुंठ्याच्या शेजारी दुसर्‍या शेतकर्‍यांची शेती असून त्या ३३ गुंठ्यात साधे अतिक्रमणही कोणी करत नाही. एकंदरीत अंधश्रद्धेपोटी लोकांनी गावच सोडले हा संशोधनाचा विषय असून प्रशासनाने अशा जागेचा उपयोग शासकीय कामासाठी करावा जेणे करून शेजारच्या शेतकर्‍यांची व गाव सोडून गेलेल्या ग्रामस्थांची दहशत कमी होईल. अनेक ठिकाणी करणी, धरणीच्या नाावावर काही लोक आपले हीत साधतात. त्यांना बळी न पडता लोकांनी त्यांचे षडयंत्र हाणुन पाडावे जेणेकरून अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

करणी-धरणीसारखे षडयंत्र
अनेक ठिकाणी शहर असो की ग्रामीण भाग प्रत्येक ठिकाणी एखादा खंडर झालेले घर किंवा वाडा असतोच. त्या संदर्भात नवीन-नवीन किस्से हे सर्वांनाच माहित आहे. काही ठिकाणी शेतीचे वाद, त्या वादातून भूत, प्रेत किंवा चमत्कारी घटना घडत असल्याची चर्चा, चर्चातून निर्माण झालेली भिती, ही भिती कायम ठेवण्यासाठी लहान मुलांना किस्सा म्हणून सांगणारे घरचे मोठे यातूनच अंधश्रद्धेला वाव भेटलेला आहे. करणी-धरणीच्या नावावर अनेक ठिकाणी विकासाची कामेही खोळंबळलेली दिसून येतात. करणी-धरणीचा वापर हमखास स्वत:चे हीत साधण्यासाठी होतो. हा षडयंत्राचा भाग असला तरी भितीमुळे कोणीही पुढाकार घेत नाही. म्हणून अशा षडयंत्राला न घाबरता त्यांचे षडयंत्र हाणुन पाडण्यासाठी लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

हनुमान मंदिराची साक्ष
त्या ३३ गुंठे जमीनमध्ये जुने समनापूर गाव होते. त्या ठिकाणी जुने गाव असल्याची अनेक चिन्हे दिसून आली. जुने घरे पडल्यानंतर त्या घराचे पाया दगडाने बांधलेला असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जुन्या समनापूर गावातील भक्त त्या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात दिवा बत्ती लावून पुजा-पाठ करत असे. आज जरी त्या ठिकाणी जुने समनापूर गाव नसले तरी मंदिरात ग्रामस्थ पुजा, पाठ करत असतात. जुने समनापूर असल्याची साक्ष स्वत: त्या ठिकाणी असलेले हनुमान मंदिर असून त्या परिसरात जुने घरे व इतर जुन्या खूना दिसून आल्यानंतर रिपोर्टरच्या प्रतिनिधीने संबंधित ३३ गुंठे जमीनीची चौकशी केली असता वरील बाब समोर आली असून अंधश्रद्धा जनजागृती नसल्याने त्यावेळी अशा घटना हमखास होत होत्या. परंतू सध्या अंधश्रद्धेला थारा मिळत नसून आता अशा प्रकारच्या घटनेला दुजोरा मिळणार नाही.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...