Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडकुमावतांच्या पथकाने टाकल्या धाडी, २ लाखांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त

कुमावतांच्या पथकाने टाकल्या धाडी, २ लाखांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त


परळी (रिपोर्टर) परळीत किराणा मॉल आणि एका घरात पंकज कुमावतांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल २ लाखांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा मिळून आला. या प्रकरणी चार जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून एकाला ताब्यात घेण्यात आले असून तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

परळी येथे सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या राघव इन्टरप्राजेस या किराणा मालाच्या दुकानात गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच; त्यांनी धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात छापा मारला. त्या छाप्यात परळी येथील सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात धाड टाकली. त्या धाडीत पोलीस पथकाला गोवा गुटखा, बाबा पान मसाला, रॉयल तंबाखू, विमल पान मसाला, आर एम डी पान, आर एम डी सेंटेड तंबाखू, राजनिवास पान मसाला, जाफराणी जर्दा, व्ही-वन तंबाखू, प्रिमियम जाफराणी जर्दा, सुगंधित जर्दा व एक्का असा महाराष्ट्रात बंदी असलेला व आरोग्यास अपायकारक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ असलेला ८० हजार ९४३ रु. किंमतीचा माल मिळून आला.

ips pankaj muwavat


तसेच वैभव बुरांडे यांच्या विद्यानगर भागातील घरी पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी धाड टाकली. त्यात विद्यानगर नगर यातील वैभव बुरांडे याच्या घरी पोलीस पथकाला बाबा पान मसाला, रॉयल तंबाखू, विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला आणि सेंटेड तंबाखू १ लाख ३० हजार ९१० रु. किंमतीचा आरोग्याला हानिकारक आणि राज्यात बंदी असलेला तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला. या दोन ठिकाणी पंकज कुमावत यांच्या पथकाने २ लाख ११ हजार ८५३ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून संभाजी नगर पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाणे परळी येथे चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपीला ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!