बीड (रिपोर्टर) मार्च एन्ड संपायला चार दिवस बाकी असतानाच शिक्षण विभागाचे बीडीएस बंद झाले असून अर्थमंत्रालयाने बीड शिक्षण विभागाचे 11 कोटी 55 लाख रूपयाचे आपल्याकडे वळते करून घेतले आहे.
शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि वेतन रजा, वैद्यकीय बिले यासाठी बीड शिक्षण विभागाकडे 11 कोटी 55 लाखाचा निधी शिल्लक होता. या 11 कोटी 55 लाखातून 31 मार्च पर्यंत दाखल झालेले बिले पास करायचे होते. मात्र मार्च एन्डच्या अगोदरच आठ दिवस अर्थ मंत्रालयाने हे बीडीएस बंद करून आपल्याकडे पैसे वळते करून घेतले आहे.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.