Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडबीडमध्ये गॅस 1020 रूपये गृहिणीचे बजेट कोलमडले

बीडमध्ये गॅस 1020 रूपये गृहिणीचे बजेट कोलमडले


बीड (रिपोर्टर) पाच राज्यातल्या निवडणूका संपताच केंद्र शासनाने महागाईचा भडका उडवून दिला आहे. घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले असून बीडमध्ये तब्बल 1020 रूपये मोजून गॅस घ्यावा लागत आहे. गूसची मुळ किंमत 990 रूपये तर घरपोच 30 गॅस मिळण्यासाठी वरचे 30 रूपये मोजावे लागत आहेत. त्या तुलनेत सबसिडी मात्र 9 रूपये 95 पैसे मिळते.


दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज वाढत असून आता घरगुती वापरण्याचा गॅसही वाढू लागला आहे. गेल्या चार दिवसापासून गॅसची किंमत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज बीडमध्ये गॅस घेण्यासाठी तब्बल 1020 रूपये मोजावे लागत आहे. महागाई प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. यातच किराणा मालही 20 टक्याने वाढला आहे. तेलाच्या किमती दुप्पट गेल्या आहेत. त्या तुलनेत रोजगार आहे त्याच ठिकाणावर असल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!