Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडधारूरमध्ये मुकादमाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय?

धारूरमध्ये मुकादमाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय?


धारूर (रिपोर्टर) बेपत्ता असलेल्या एका साठ वर्षीय मुकादमाचा मृतदेह आज सकाळी किल्ल्याच्या बाजूला असलेल्या दरीत आढळून आला. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेनाला पाठवून दिला.

नवनाथ धपाटे (वय 60) यांचा मृतदेह आज सकाळी किल्ल्याच्या बाजूला असलेल्या दरीमध्ये आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यांच्या खिशातील आधारकार्डमुळे त्यांची ओळख पटली. नवनाथ धपाटे हे शुक्रवारपासून गायब होते. त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!