Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडबीडमध्ये पुन्हा शिवसेनेची ललकारी, गडावर आज पाच शिलेदारांची वर्दी

बीडमध्ये पुन्हा शिवसेनेची ललकारी, गडावर आज पाच शिलेदारांची वर्दी


बीड (रिपोर्टर) कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीडमध्ये शिवसेनेची ललकारी शांत होती. मात्र आता पून्हा बीडच्या गडावर समाजकारण करणार्‍या पाच शिलेदारांची वर्दी होत असल्याने शिवसेनेची ललकारी शहरातल्या गल्लीबोळात पून्हा एकदा ऐकवयास येणार. ग्रामीण भागासह शहरी भागात लोकात राहून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवत सातत्याने राजकारणाचे दुसरे नाव समाजकारण या ध्येय धोरणात असणारे जि.प.सदस्य गंगाधर घुमरे, नगरपालिकेचे गटनेते फारूक पटेल, गेली 35 वर्षापासून राजकारणात सक्रिय असणारे बाबुसेट लोढा, नगरसेवक अमर नाईकवाडे आणि बालाघाटावर अधिराज्य गाजवणारे नितीन लोढासारखे शिलेदार आज शिवसेनेत डेरेदाखल होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची प्रचंड ताकद वाढतानाच थोरल्या क्षीरसागरांचे हात यातून बळकट होणार आहेत.


इ.स.1990 च्या दशकात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बीडकडे पाहिले जात होते. त्यानंतरही शिवसेनेने आपली राजकीय ताकद कधी नगरपालिका ताब्यात घेवून तर कधी बीडचा आमदार बनून दाखवून दिली होती. मात्र गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात बीडची शिवसेना अलगडीला पडली होती. त्यामुळे शिवसेनेची ललकारी ऐकावयास येत नव्हती. मात्र आता पून्हा बीडच्या गडावर पाच शिलेदारांची वर्दी होत असल्याने शहरात पून्हा शिवसेनेची ललकारी दुमदुमणार गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीपासून अलिप्त असलेले आणि ग्रामीण भागात वर्चस्व कायम ठेवणारे लोकामधले जिल्हा परिषदेचे सदस्य गंगाधर घुमरे, नगरपालिकेचे गटनेते फारूक पटेल, गेल्या तीन दशकात राजकारणात सक्रिय असणारे बाबुसेट लोढा, लोकांमधल्या कामात तत्पर राहणारे नगरसेवक अमर नाईकवाडे आणि चौसाळ्यासह परिसरातील पाच पन्नास गावात आपल्या सामाजिक कार्यातून दबदबा निर्माण करणारे नितीन लोढा हे पाच शिलेदार आज शिवसेनेत डेरेदाखल होत आहेत. या पाच शिलेदारांच्या बळावर बीडची शिवसेना पून्हा एकदा ताकदवान होणार असून राजकारणातले थोरले घर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते जयदत्त क्षीरसागर यांचे हात यामुळे बळकट होणार आहेत. आवाज कुणाचा, शिवसेनेचा…या घोषणा आणि ललकार्‍या नव्वदच्या दशकात जशा विरोधकांच्या कानठळ्या बसवत होत्या तशाच ललकार्‍या पून्हा एकदा बीडमध्ये घुमणार असल्याचे चित्र या शिलेदारांच्या प्रवेशावरून दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!