Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडउद्याच्या भारत बंदला अनेक पक्ष -संघटनांचे समर्थन

उद्याच्या भारत बंदला अनेक पक्ष -संघटनांचे समर्थन

उद्याच्या भारत बंदला अनेक पक्ष -संघटनांचे समर्थन
बीडमध्येही बंदमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संघटनांचे आवाहन
राज्यातील बाजार समित्या उद्या बंद, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
बीड (रिपोर्टर)- नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या ८ डिसेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून अनेक पक्ष-संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत भारत बंदमध्ये सहभाग नोंदवलेला असतानाच आता राज्यातील बाजार समित्यांनीही उद्या मार्केट बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. बीड जिल्ह्यातही अनेक शेतकरी संघटनांसह अन्य संघटनांनी भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे.

नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. उद्या ८ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर या आंदोलनासह उद्याच्या बंदमध्ये सामील होण्यासाठी अनेक पक्ष संघटनांनी समर्थन दिलं आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एलएल),

 आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यासह अन्य पक्ष-संघटनांचा यामध्ये समावेश आहे. उद्याच्या भारत बंदला सर्वस्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच राज्यातील बाजार समित्यांचा या बंदला पाठिंबा असल्याने उद्या राज्यात अनेक मार्केट बंद राहणार आहेत. सोलापूर, नाशिक, लासल गाव, नवी मुंबई, पुणे, धुळे यासह राज्यातील अन्य प्रमुख शहरातील बाजार समित्या बंद असून हमाल मापाडी युनियन,

 महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे, यासह ठिकठिकाणच्या हमाल मापाडींनीही या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. बीड जिल्ह्यातही शेतकरी संघटनांसह अन्य संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून भारत बंदला समर्थन देत उद्याचा बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केलं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!