Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडबीड शहरात घरफोडी

बीड शहरात घरफोडी


बीड (रिपोर्टर) अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटाचे लॉक तोडून त्यातील सोने-चांदीचा ३५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रात्री संत नामदेव नगर भागात घडली आहे. या प्रकरणी संदीपान विक्रम ढोरमारे यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत नामदेव नगरमध्ये संदीपान ढोरमारे राहतात. काल रात्री ते जेवण करून घरात झोपले असता रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले ९ ग्रॅमचे मिनी गंठण, कानातील झुंबर, बाळ्या असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!