Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडदहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या


बीड (रिपोर्टर) शहरातील छत्रपती कॉलनी भागात राहणार्‍या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदरील आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

श्रृष्टी रोहीदास काळे (वय १६, रा. छत्रपती कॉलनी, पालवण रोड, बीड) या विद्यार्थिनीने रात्री आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देत होती. तिने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. श्रृष्टी हिची आई लहानपणी मरण पावल्याने ती आपल्या मामाकडे गेल्या काही वर्षांपासून राहत असे. तिच्या या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!