Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईअन्याय होत असेल तर पक्षप्रमुखांनी आघाडीबाबत फेरविचार करावा- आ. तानाजी सावंत यांचा...

अन्याय होत असेल तर पक्षप्रमुखांनी आघाडीबाबत फेरविचार करावा- आ. तानाजी सावंत यांचा पक्षप्रमुखांना सल्ला


मुंबई (रिपोर्टर) शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.


आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही, असं सांगत त्यांनी आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय असा इशाराही दिला. दरम्यान आदित्य ठाकरे कोकण दौर्‍यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.
राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटीचा निधी आणतो आणि आम्ही शिवभोजन थाळीवरच; शिवसेना आमदाराची जाहीर नाराजी मीदेखील मुंबई उपनगराचा पालकमंत्री आहे. प्रत्येकजण कुठला तरी पालकमंत्री असतो. महाविकास आघाडीसारखा प्रयोग राजकीयदृष्ट्‌या आणि विकासासाठी यशस्वी ठरला आहे. काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढलेले असतात तिथे ही खदखद असते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून या नाराजी दूर करतात. राजकारणात थोडं पुढे मागे हे चालत राहतं. पण आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत हे महत्वाचं आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. सत्तेतून बाहेर पडण्यासंबंधी त्यांचं मत वैयक्तिक असेल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!