Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमलॉकडाऊन काळातले सर्व गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

लॉकडाऊन काळातले सर्व गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय


हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, व्यापार्‍यांसह सर्वसाामन्यांचे १८८ अंतर्गत गुन्हे मागे घेतले जाणार

मुंबई (रिपोर्टर) कोरोनाच्या कार्यकाळामध्ये राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर या कालखंडात राज्यभरात सर्वसामान्यांसह विद्यार्थी वर्गावर कलम १८८ अंतर्गत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. परिणामी विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना उच्च शिक्षणासाठी अडथळे निर्माण होत असल्याने राज्य सरकारने आता कोरोना काळात दाखल करण्यात आलेले कलम १८८ अंतर्गतचे सर्व गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राज्यभरात दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात येते. लॉकडाऊन काळामध्ये व्यापार्‍यांसह सर्वसामान्यांवरही मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झालेले आहेत. राज्यातील ठाकरे सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे.


दहा हजारांच्या आसपास या विद्यार्थ्यांची संख्या असल्याचं समजतंय. या संदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय की, कोरोना काळामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या काळात काही नागरीकांवर तसेच विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. हे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडला जाईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता या विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत आहे त्यामुळे गृह विभागाने त्यांचा विचार करुन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अंमलबजावणीसाठी गृह खात्याने राज्यांतील १८८ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.बैलगाडा शर्यती चालकांवरील राजकिय गुन्हे असतील. बैलगाडा शर्यतीबाबतचे गुन्हे असतील, त्याच्या संदर्भात गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. सर्व जिल्हा प्रमुख लवकरच माहिती गृहखात्याला पाठवतील आणि त्यानंतर गुन्हे मागे घेतले जातील. यापूर्वी ज्या केंद्रिय यंत्रणाकडून कारवाया होत होत्या. त्याच्या प्रेसनोट काढण्यात येत नव्हत्या. किंवा कोणत्याही माध्यमातून ती माहिती बाहेर देत नव्हते. परंतु आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाणीपूर्वक माहिती बाहेर देत आहेत, त्यातून त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य केला जात आहे. हे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे.

Most Popular

error: Content is protected !!