Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडमहागाईचा कहर झाला खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले

महागाईचा कहर झाला खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले


बीड (रिपोर्टर) वाढत्या उन्हासोबत महागाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागतात. डिझेल, पेट्रोल, गॅस सोबतच खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना तेल खावे की नाही? असा प्रश्‍न पडू लागला. सगळ्यात जास्त करडई तेल 230 किलो झाले आहे. इतर तेलाचीही चांगलीच भाववाढ झाली आहे.


आमचं सरकार आल्यानंतर महागाई कमी करू असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी 2014 साली दिले होते. सरकार येताच महागाई कमी होण्याऐवजी वाढत गेली. सात वर्षात दुपटीने महागाई वाढली. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस प्रचंड प्रमाणात वाढले. त्याचबरोबर खाद्यतेलाचे भावही वाढले आहे. वाढती महागाई पाहता सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला. सध्या सोयाबीन तेल 170 रू., सुर्यफुल तेल 200, करडई 230, शेंगदाणा तेल 180 आणि पाम तेल 155 रू. झाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!