बीड (रिपोर्टर) आरटीओ कार्यालयातील कारभाराचे नेहमीच वाभाडे निघत असतात. याठिकाणी आलेल्या सर्वसामान्य वाहनधारकांची अडवणूक केली जाते. आरटीओ इन्स्पेक्टर प्रविण भोसले यांनी अनागोंदी कारभाराचा कळस गाठला. त्यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे वाहनधारक प्रचंड प्रमाणात वैतागले असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात गाड्यांची पासिंग केल्यानंतर ज्या लोकांचे पैसे आले त्या लोकांचे फिटनेस ऑनलाईन केले. ज्या लोकांचे पैसे आले नाही त्यांचे फिटनेस तसेच आहेत. त्याचे ऑनलाईन केले नाही. गाड्याही ऑनलाईनमध्ये फेल केल्या नाहीत. भोसले यांची ड्युटी मार्च महिन्यात बॉर्डरला लागल्यास ते निघून गेले. त्यांचा संपर्क वाहनधारक करत असतात मात्र ते दुप्पट पैशाची मागणी करत असतात. कित्येक गोरगरिब लोकांना मार्च महिन्यात भोसले यांनी पाहिलेल्या गाड्यांना पासिंग नाही म्हणून दंड लागला. पासिंगचा दंड वीस हजार रू.इतका आहे. गरिब वाहनधारकांना इतका दंड भरणे परवडत नाही. दरम्यान भोसले हे जाणिवपूर्वक वाहनधारकांची अडवणूक करत असून त्यांच्याशी व्यवहार करणार्यांचे मात्र ते कामे करतात. त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.