बीड (रिपोर्टर) शिवाजी नगर ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हे घडू लागले आहेत. शिवाजीनगर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे फावत आहे. रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कमेसह सोन्याचांदीचा असा 33 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चर्हाट रोडवरील नवीन पोलिस रोहाऊस मध्ये घडली.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चोर्या वाढल्या आहेत. रस्त्याने जाणार्या महिलांच्या गळ्यातील गंठन भरदिवसा ओरबडले जाते, हाणामार्या, खूनासह तलवारबाजी आणि दिवसाढवळ्या पिस्टल घेवून फिरणारे येथे कमी नाहीत. पोलिसांचा धाकच राहिला नाही शिवाय रात्रंदिवस घरफोड्या होत आहेत. चर्हाटा रोडवरील पोलिस रोहाऊस नंबर 1 मध्ये दि.29 ते 30 मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रिया रोहित सोनवणे या महिलेच्या घरी प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा 33 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.