Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडअनिल जगताप यांना चांगली संधी!

अनिल जगताप यांना चांगली संधी!


मजीद शेख
बीड मतदार संघ पुर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1990 मध्ये या तालुक्यात परिवर्तन झालं. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बीडमधील जनतेने आपलेसे केले, आणि शिवसेनेचं एक मोठं संघटन बीडमध्ये निर्माण झालं. प्रस्थापीतांना हादरा देण्याचं काम यापुर्वीच्या शिवसैनिकांनी केलं. तीन वेळा बीडने शिवसेनेचा आमदार निवडुन दिला. राष्ट्रवादीच्या उदयानंतर शिवसेनेला घरघर लागत गेली. बीडमध्ये दोन जिल्हा प्रमुख पदे देण्यात आले. त्यात एक अनिल जगताप आणि दुसरे बाळासाहेब पिंगळे हे होते. या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी अनेक वर्ष पद सांभाळले. त्यानंतर त्यांच्या जाग्यावर नव्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. नव्या जिल्हा प्रमुखांना जास्त दिवस पद सांभाळता आलं नाही. खांडे यांच्या जाग्यावर कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष होते, यामध्ये अनेक इच्छूक होते. इच्छुकांच्या यादीत सर्वात पुढे नाव होते, अनिल जगताप याचं, जगताप यांची पुन्हा वर्णी लागली. अनिल जगताप यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यांना जिल्हयातील राजकारणाची चांगली जाण आहे. पक्षाने त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी टाकली. जगताप यांना चांगली संधी चालून आली आहे. त्या संधीचं त्यांनी सोनं करावं.
प्रस्थापीतांच्या राजकारणाला छीद्र पाडणं तसं अवघड असतं. शिवसेनेने भल्या, भल्यांना घाम फोडलेला आहे. बीड जिल्हयात अनेक वर्ष कॉग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यानंतर राष्ट्रवादीने जम बसवला. 1990 च्या कार्यकाळात बीडच्या शिवसैनिकांनी शिवसेनेचा आमदार निवडून दिला. प्रा. सुरेश नवले दोनदां आणि प्रा. सुनिल धांडे हे एकदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. नवले, धांडे यांच्या नंतर शिवसेनेची जबाबदारी अनिल जगताप आणि बाळासाहेब पिंगळे यांच्यावर सोपवण्यात आली. हे दोघे ही एकाच वेळी जिल्हाप्रमुख झाले होते. अनेक वर्ष ते पदावर होते. मध्यंतरी त्यांच्या जाग्यावर नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. सचिन मुळूक व कुंडलीक खांडे यांची वर्णी लागली. या दोघांना आपलं पद जास्त दिवस टिकवता आलं नाही. मुळूक यांच्या जाग्यावर अप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. कुंडलीक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्याचं पद काढून घेण्यात आलं. खांडे यांच्या नंतर कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वाचं लक्ष लागून होतं. इच्छुकात अनेकांची नावे होती. अनिल जगताप यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास टाकून त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपद देण्यात आलं. जगताप हे अनेक वर्षापासून शिवसैनिक आहेत. त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्यांची इमेज ही चांगली राहिलेली आहे. जगताप यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांत चैतन्य निर्माण झाले. येत्या काही महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीपुर्वी शिवसेनेत पक्ष प्रवेशाला सुरुवात झाली. दोन दिवसापुर्वी पाच जणांनी पक्षात प्रवेश केला. स्थानिकच्या निवडणुकीतून जगताप यांना आपली ताकद दाखवण्याची चांगली संधी आहे. बीड मतदार संघात शिवसेनेचं पुर्वीपासून चांगलं प्राबल्य राहिलेलं आहे. शिवसेनेचं गेलेलं वैभव पुन्हा निर्माण होवू शकतं. अनिल जगताप यांना जिल्हाप्रमुख पदाच्या माध्यमातून चांगली संधी आली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!