बीड (रिपोर्टर) दिलेला चेक वटला नसल्याने याबाबत संबधीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्याायलयाने दोषीला सहा महिन्याची शिक्षा ठोठावून फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
घाटसावळी येथील गुरूकृपा ट्रेडींग कंपनीचे प्रो. पंढरीनाथ तुकाराम लांडे यांना बापूराव धोंडीबा नागरगोजे रा.वडगांव (गुंदा) यांनी दि.1 सप्टेंबर 2017 रोजी हात उसने चार लाख रुपये दिले होते. सदर रक्कम परत फेडीकरीता आरोपी पंढरीनाथ तुकाराम लांडे याने त्याच्या गुरूकृपा ट्रेडींग कंपनीचे दि.1/02/2018 या तारखेचे तिन लक्ष रुपये व एक लक्ष रुपये रकमेचे दोन धनादेश फिर्यादी बापूराव धोंडीबा नागरगोजे यांच्या नावे लिहून दिले होते. मात्र दोन्ही धनादेश अनादर झाल्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुध्द कायदेशीर प्रकीया पुर्ण करुन फौजदारी केस दाखल केली. फिर्यादी व आरोपी यांचा व त्याचे साथीदार यांच्या साक्षी पुराव्यानतर प्रथम न्यायदंडाधिकारी सि.पी.शेळके यांनी उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकूण आरोपी गुरूकृपा टे्रडींग कंपनीचे पंढरीनाथ तुकाराम लांडे यांना कलम 138 एनआय अॅक्ट अन्वये दोषी ठरवून आरोपीस सहा महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. तसेच आरोपीने फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचे आदेश ही दिले आहे. सदर प्रकरणात फिर्यादीच्यावतीने अॅड.बप्पा औटे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.रामदास चव्हाण, अॅड.श्रीराम मांडवे, अॅड.सुरेश हांगे यांनी सहकार्य केले.