वृक्षप्रेमींनी आग विझवण्याच केला प्रयत्न; आग लागण्याचे कारण समजू शकले नाही
धारुर (रिपोर्टर) यंदा उन्हाची तिव्रता अधिकच जाणवू लागली. मार्च महिन्यामध्ये तिव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. अशा उन्हाच्या तिव्रतेत डोंगरी भागात आगीच्या घटना घडू लागल्या. आज सकाळी धारुरच्या डोंगरात आग लागल्याने या आगीमध्ये शेकडे झाडे जळून खाक झाली. काही वृक्ष प्रेमींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तिव्रता अधिक असल्याने आग आटोक्यात आली नव्हती. सदरील या आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
धारुर येथील डोंगराला आज सकाळी आग लागली. या आगीमध्ये डोंगरावरील लहान मोठी झाडे जळून खाक झाली. डोंगरावर मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत असल्याने आगीची तिव्रता अधिकच होत गेली. आग लागल्याची माहिती काही वृक्षप्रेमींना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. सदरील ही आग कशी लागली हे स्पष्ट झाले नव्हते. यंदाचा उन्हाळा तिव्र जाणवू लागला. उन्हाच्या तिव्रतेत आगीच्या घटना घडत असल्याने यात मोठे नुकसान होवू लागले. आतापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा जळीत घटना घडलेल्या आहे.