बीड (रिपोर्टर) येथील वकील शेख सोहे यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील खासबाग परिसरात दोन-तीन दिवसांपूर्वी सायंंकाळच्या दरम्यान घडली. या मारहाणीत अॅड. शेख जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बीड शहरातील ढगे कॉलनी येथील अॅड. शेख सोहेल युसुफ हे न्यायालयाकडून कासबाग मार्गे ढगे कॉलनीकडे जात असताना त्या ठिकाणी आलेल्या चौघांनी त्यघांना अडवून बेदम मारहाण केली. यापूर्वी ढगे कॉलनीत विद्युत डीपीवर येम्पो धडकल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्या टेम्पोचे फोटो काढून ते सोशल मिडियावर टाकले होते त्यामुळे त्यांना यापूर्वी घरात घुसून दमदाटी व मारहाणीचा प्रयत्न झाला होता. मात्र काही लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरर मिटले होते, त्याच कारणातून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येते.