बीड (रिपोर्टर) बीडच्या आरटीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार नेहमीच समोर आलेला आहे. त्या कार्यालयाचा कारभार सुधारण्यात यावा या मागणीचे निवेदन थेट मुख्यमंत्र्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तीन वर्षांपासून बीडच्या आरटीओ कार्यालयामधील ऑनलाईन कामकाज बंद आहे. दरम्यान यापुर्वी ऑनलाईन कामकाज होत होतं. मेहरकर, काठवळे, चव्हाण यांच्यासह अन्य अधिकार्यांच्या कार्यकाळात कामकाज करण्यात आलेले होते. मात्र सध्या कार्यालयातील कामकाज अनागोंदी पद्धतीने सुरू आहे. कित्येक लोक जुन्या गाड्या ऑनलाईन पासिंगसाठी चकरा मारत असतात. दोन दिवसांच्या कार्यकाळात गाडी ऑनलाईन न झाल्यास त्याला वाढीव दंड लागतो. हा वाढीव दंड कार्यालयातील अधिकारी भरणार का, जेणेकरून कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे वाहनधारकांच्या गाड्या पासिंग होऊ शकत नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांना अॅड. राजेंद्र नवले, भाई शेख राजू, शेख रमिज यांनी निेवेदन दिले.