पाटोदा (रिपोर्टर) पारगाव घुमरा तालुका पाटोदा येथे रात्री एक ते दीडच्या दरम्यान चार ते पाच चोरटे टावर वरील वायर चोरण्यासाठी आले असता शेजारील घरातील एक जण उठून बाहेर आला असता त्याला चोरट्यांनी अर्धा किलोमीटर फरफटत ओढत नेवुन गंभीर मारहाण केली.
काल रात्री पारगाव घुमरा तालुका पाटोदा येथे रात्री एक ते दीड च्या सुमारास चार पाच चोरटे आयडिया व एअरटेलच्या टॉवर वरील वायर चोरण्याच्या उद्देशाने आले असता टॉवरच्या शेजारी घरातील प्रशांत भोसले हे शेतात मोटर चालू करायला जाण्यासाठी उठून ते घरा बाहेर आले असता त्यांना चोरट्यांचा केबल चोरीचा डाव असफल झाल्याने चोरट्यांनी घराजवळून फरफटत ओढत नेवुन गंभीर मारहाण केली असून ते जखमी झाले असून त्यांचा डोळ्याला गंभीर जखम झाली असुन त्यांना उपचारासाठी बीडला अडमीट केले आहे. या घटनेची फिर्याद पाटोदा पोलीस स्टेशनला देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.