Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडस्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यातील 378 शाळांचाच सहभाग

स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यातील 378 शाळांचाच सहभाग


बीड (रिपोर्टर) भारत सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ विद्यालय, पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यासाठी आतापर्यंत केवळ 50 टक्के शाळांनीच नोंद केली असून जिल्ह्यातील फक्त 378 शाळांनीच यात सहभाग घेतलेला होता.

अभियानात शाळा स्वच्छता, पाणी व्यवस्था, आरोग्याबाबत जागृती, परिसर तसेच कोरोना काळातील केलेल्या कामाचे मूल्यमापन बघून पुरस्कार देण्यात येणार आहे. शहरी, ग्रामीण शासकीय, निमशासकीय, आासकीय, निवासी-अनिवासी अशा कोणत्याही शाळांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!