Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमकुमावतांच्या पथकाचा बालेपीरमध्ये छापा, लाखोंच्या मुद्देमालासह 10 जुगारी पकडले

कुमावतांच्या पथकाचा बालेपीरमध्ये छापा, लाखोंच्या मुद्देमालासह 10 जुगारी पकडले


14 जणांवर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन चक्री जुगारावर एसपींच्या पथकाने छापा मारून नऊ चक्री चालवणार्‍यांसह 29 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर भागात धाड टाकून एक जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. त्याठिकाणावरून लाखोंच्या मुद्देमालासह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले तर 4 जण फरार झाले. एकूण 14 जणांवर पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या आशीर्वादाने बीड शहरात गुटखा माफिया सक्रिय झालेले आहेत. याच हद्दीत मोठ्या प्रमाणात ऑनलाई चक्री नावाचा जुगार खेळविला जातोय. जागोजागी येथे जुगार अड्डे आहेत. याकडे स्थानिक पोलीस अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील सुजान नागरिकांकडून होत आहे. काल एसपींच्या पथकाने टाकलेल्या धाडीत स्थानिक पोलीस काय करतात हे दिसूनच आले. त्यापाठोपाठ रात्री कुमावतांच्या पथकाने बालेपीरमध्ये छापा टाकून एक जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. त्यामध्ये मुज्जु कुशन वर्कस्च्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सय्यद मुस्तफा हा स्वत:च्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या इसमांना एकत्र बसून मिलन नाईट जुगारावर पैसे लावून जुगार खेळत होता. या प्रकरणी सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अंमलदारांनी छापा मारला असता 12 जुगारी जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून नगदी रोख रकमेसह मोबाईल असा एकूण 1 लाख 26 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मटका घेणारे व खेळणारे इसम व मूळ मालक असे एकूण 14 जणांविरोधात पोलीस नाईक राजू वंजारे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई सहायक पोलीस अधिक्षक कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक मनोज कुलकर्णी, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, सचिन अहंकारे, संजय टुले यांनी केली.


शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या
हद्दीत अवैध धंदे वाढले

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज कुठे ना कुठे घरफोडी होते, रस्त्यावरून चालणार्‍या महिलांच्या गळ्यातील गंठण भरदिवसा ओरबाडले जाते, खुलेआम तलवारबाजी होते, याबरोबरच मटका, गुटखा आणि ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणावर खेळविले जातात. याकडे शिवाजीनगर पोलीस दुर्लक्ष करते. केजहून आलेल्या कुमावतांच्या पथकाला हे दिसते मात्र स्थानिक पोलिसांना ते दिसत नाही.

Most Popular

error: Content is protected !!