केज (रिपोर्टर) केज तालुक्यात अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत असल्याची माहिती कुमावत यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील बालाजी दराडे आणि अन्य कर्मचार्यांनी सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर आणि वाळुचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई काल सायंकाळी बोरगाव शिवारात केली.
बोरगाव शिवारातील वांजरा नदी पात्रातून वाळुचा उपसा करून ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 44 – एस. 3086) हे वाहतूक करत असल्याची माहिती कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती. पथकाने त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर थांबवले. या वेळी चालक सिद्धेश्वर माने आरकडे (रा. बोरगाव) याच्याकडे ट्रॅक्टरमधील वाळुच्या पावत्या विचारले असता त्याने काहीच दाखविले नाही. सदरील ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचवेळी रमेश गव्हाणे (रा. बोरगाव) यांच्या घरासमोर वाळुचा साठा मिळाला. याबाबत गव्हाणे यांच्याकडे त्या वाळुबद्दल पावत्या मिळून आल्या नाही. त्यामुळे कुमावत यांच्या पथकाने याबाबत तहसीलदारांना पत्र दिले आहे.