बाहेरचा ऊस न आणता स्थानिकचा सर्व ऊस गाळप करा
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस असताना काही कारखाने बाहेरून ऊस आणत असल्याने स्थानिक उसाचे गाळपाअभावी चिपाळे होऊ लागले. सर्व उसाचे गाळप करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काळी गुढी उभारून अनोखे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
माजलगाव तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात असताना येथील कारखानदार परभणीसह इतर तालुक्यातील ऊस गाळपासाठी आणत असल्याने स्थानीकचा ऊस तसाच उभा आहे. या प्रकरणी साखर आयुक्तालयाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यांनी याबाबतची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. इतर तालुक्यातील उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सर्व ऊस गाळप करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज गुढी पाडव्याच्या दिवशी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारून शेतकरी संघर्ष समितीने अनोखे आंदोलन केले. सदरील हे आंदोलन भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी काही शेतकर्यांची उपस्थिती होती.
00