दोघा जणांवर गुन्हा दाखल
गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने घरात मोठ्या प्रमाणात गुटखा ठेवून त्याची शहरात विल्हेवाट लावत असल्याची माहिती माजलगावचे पोलीस उपअधिक्षक सुनिल जायभाये यांना मिळाली असता त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जोनवाल आणि त्यांच्या पथकाला सदरील ठिकाणी पाठवले असता पथकाने त्या ठिकाणावरून तब्बल 5 लाख 40 हजार 320 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई रात्री माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयाच्या पाठीमागील संताजीनगर येथे करण्यात आली.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना जिल्ह्यात मोठया प्रमाणात गुटखा येतो, त्याची सर्रास साठवणूक होत असून शहरासह ग्रामीण भागात विल्हेवाट लावली जाते. माजलगाव शहरातील संताजी नगर येथे घरात मोठया प्रमाणात गुटखा साठवून ठेवला असून त्याची शहरात विल्हेवाट लावत असल्याची माहिती माजलगावचे पोलीस उपअधिक्षक सुनिल जायभाये यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जोनवाल यांच्यासह उपविभागीय कार्यालयाचे आतिषकुमार देशमुख पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार नरवणे, महिला पोलीस नाईक मस्के, ढगे, माजलगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक दाभाडे यांनी काल संताजीनगर येथील ज्ञानेश्वर बालासाहेब देशमाने यांच्या गरी धाड टाकली असता तेथे आरएमडी गोवा, राजनिवास यासह आदी गुटखा मोठ्या प्रमाणात मिळून आला. त्याची किंमत 5 लाख 40 हजार 320 रुपये आहे. पोलिसांनी तो जप्त करून पुढील कारवाईसाठी शहर पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर बालासाहेब देशमाने व विलास अमरनाथ राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
0000