केज (रिपोर्टर) आसावणी ‘डिस्टीलरी’ विस्तारीत प्रकल्पाचा उदघाटन सोहळा ८ एप्रिल २०२२ रोजी होत असून सदरील हे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते होत असून या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहे. अशी माहिती येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
येडेश्वरी साखर कारखाना लि.पवनसुत नगर आनंदगाव सारणी ता.केज च्यावतीने आसवणी डिस्टीलरी विस्तारीत ६० केएलपीडी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे उदघाटन ८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राहणार असून विशेष उपस्थिती ीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची राहणार आहे. या कार्यक्रमाला आ.प्रकाश सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहे आजबे, आ.संदिप क्षीरसागर, आ.संजय दौंड, पृथ्वीराज साठे सह आदिंची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली आहे.