Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडअल्पसंख्यांक विभागाकडून बीड मतदारसंघाला १ कोटींचा निधी आ.क्षीरसागरांनी मानले आभार

अल्पसंख्यांक विभागाकडून बीड मतदारसंघाला १ कोटींचा निधी आ.क्षीरसागरांनी मानले आभार


बीड (रिपोर्टर):- बीड मतदारसंघातील विविध गावांमधील अल्पसंख्याक बहुल भागातील विकास कामांसाठी आ.क्षीरसागर यांनी अल्पसंख्यांक विभागाकडे पाठपुरावा करत निधीची मागणी केली होती.ही मागणी मान्य करत, बीड मतदारसंघातील अल्पसंख्यांक भागाच्या विकासासाठी अल्पसंख्याक विभागाकडून १ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला असून आ.संदीप क्षीरसागर यांनी मा.ना.नवाब मलिक, मा.ना. जितेंद्र आव्हाड यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत.

बीड शहरातील मोहम्मदीया कॉलनी चार बावडी येथील कब्रस्तानची संरक्षक भिंत बांधणे,जालना रोड ते जैनत्यागी भवनकडे जाणारा रस्ता तयार व नालीबांधकाम करणे,तकियॉं कब्रस्तान येथे सिमेंट रस्ता करणे,बालेपीर ईदगाह परिसरात सिमेंट रस्ता तयार करणे,दर्गा गोशानशीन साहब आणि दर्गाशाह हुसेन साहब कब्रस्तान येथील संरक्षक भिंत बांधणे,दर्गाशहा शमशोद्धीन येथील नालीबांधकाम करणे, इस्लामपुरा भागातील तकीया वारनरशहा कब्रस्तान येथे नाली बांधकाम करणे तसेच बीड तालुक्यातील पाली येथील चॉंदतारा मस्जिदजवळील कब्रस्तानाकडे जाणारा सिमेंट रस्ता तयार करणे,लिंबारुई येथे कब्रिस्तान संरक्षक भिंत बांधणे, नांदूर हवेली येथील संरक्षक भिंत बांधकाम करणे,हिंगणी हवेली येथील कब्रस्तान येथे हायमास्ट दिवे बसविणे,माळापूरी येथील संरक्षक भिंत बांधकाम करणे यासह शिरुर का. तालुक्यातील शिरापूर गात येथील संरक्षक भिंत बांधकाम करणे व शिरापूर धुमाळ येथील कब्रस्तानची संरक्षक भिंत बांधकाम करणे अशा बीड मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल भागातील विविध विकास कामांसाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी अल्पसंख्याक विभागाकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठपुरावा करत निधीची मागणी केली होती.ही मागणी मंजूर करत अल्पसंख्यांक विभागाने या सर्व प्रस्तावित विकास कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे असे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.बीड मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल बीड विधानसभा मतदारसंघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी, मा.ना.नवाब मलिक,मा.ना.जितेंद्र आव्हाड यांच्यासह पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे आभार मानत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Most Popular

error: Content is protected !!