Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडटेंडर मागे घे म्हणून पिस्टल ताणले, संतोष पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल

टेंडर मागे घे म्हणून पिस्टल ताणले, संतोष पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर) थेरा गावचे टेंडर कोणाच्या सांगण्यावरून भरले, ते मागे घे असे म्हणत राहुल टेकाळे यांच्या कानशिलेला पिस्टल लावून त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संतोष पवार याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राहुल रावसाहेब टेकाळे (रा. नागापूर बुद्रुक) यांनी विाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शासकीय ठेके घेण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी थेरला गावचे टेंडर भरलेले आहे. त्यावरून काल ते त्यांच्या बीड येथील घरी असताना सायंकाळी साडेपाच वाजता संतोष पवार याचा फोन आला आणि त्याने टेकाळे यांना जालना रोड येथे बोलावून घेतले. राहुल टेकाळे जालना रोड येथे आले असता संतोष पवार आणि सोबत आलेल्या इतर दोघांनी राहुल टेकाळे आणि त्यांच्या घरच्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देवून पिस्टल ताणली. राहुल टेकाळे यांनी हिसका देवून तेथून पळ काढला. पळून जात असताना संतोष पवार याने ‘तू कुठे जाणार आहेस, मी तुला उचलून आणीन, टेंडर परत केले नाही तर तुला ठार मारीन’, अशी धमकी दिली व कुठलेही टेंडर भरले तर तुला जिवे मारीन , अशी धमकी दिली असल्याची फिर्याद राहुल टेकाले यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली. त्यावरून संतोष पवार सह अन्य दोघांविरुद्ध कलम ३०७, ३, २५, ५०६, ३४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!