Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडकेजकेज तालुक्यात मानवी देहाला जाळलं आडस-होळ रस्त्यावर जळालेला मृतदेह आढळला

केज तालुक्यात मानवी देहाला जाळलं आडस-होळ रस्त्यावर जळालेला मृतदेह आढळला


केज (रिपोर्टर) अनोळखी व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार घातपाताचा असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती युसुफ वडगाव पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल व घटनेचा पंचनामा केला. हा प्रकार आडस-होळ रस्त्यावर घडला आहे.

केज तालुक्यातील आडस-होल रस्त्यावरील वेदांत साधना स्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पुर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती युसुफवडगाव पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला सदरील व्यक्तीला कडब्याच्या बुचाड्यात जाळण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हा मृतदेह पुर्णपणे जळालेला आहे. त्याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून मृतदेह महिलेचा आहे की, पुरुषाचा याचाही अंदाज येत नाही. या घटनेने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!