Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीएक दिवस बळीराज्याच्या हक्कासाठी भारत बंदला आष्टी तालुक्यात उत्स्फुर्त पाठिंबा

एक दिवस बळीराज्याच्या हक्कासाठी भारत बंदला आष्टी तालुक्यात उत्स्फुर्त पाठिंबा

आष्टी ( रिपोर्टर ) :-केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच ८ डिसेंबरला ’भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.

ashti 2


आष्टी तालुक्यात भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेससह आष्टी तालुक्यातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी या बंदला समर्थन दिलं आहे.आष्टी,कडा,शहरातील बाजारपेठा अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या.या केंद्रसरकारचा निषेध व्यक्त करत

ashti 3

राष्ट्रवादी कॉंग्रेस,शिवसेना,कॉंग्रेस,प्रहार संघटना,संभाजी ब्रिगेड,स्वाभीमानी शेतकरी संघटना,या संघटनाबरोबर १८ संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.या आंदोलन कर्तांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत गेंड्याचे कातडे घातलेल्या सरकारने तात्काळ शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा दिला.

ashti 4

यावेळी बोलताना सतिश शिंदे,आण्णा चौधरी,शिवाजी राऊत,रविंद्र ढोबळे,भाऊसाहेब लटपटे,विनोद निंबाळकर,जालिंदर वांढरे,किशोर हंबर्डे,संग्राम आजबे,डॉ.नदीम शेख,आदींनी सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.यावेळी बाबासाहेब वाघुले,संदिप अस्वर,अशोक पोकळे,जालिंदर वांढरे,भाऊ,घुले,नाजिम शेख,सुरेश पवार,वसिम शेख,आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!