केज (रिपोर्टर)ः- केजच्या नायाब तहसिलदार आशा वाघ यांच्या मृत्युचे बोगस प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उद्यडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
आशा वाघ या केज येथे नायाब तहसिलदार आहे. त्यांच्या नावाचे मयताचे बोगस प्रमाणपत्र काढण्यात आल्याची तक्रार मधुकर दयाराम वाघ यांनी केलेली आहे. सदरील हे प्रमाणपत्र चाळीस गावच्या नगर परिषदेमधून काढले असल्याचे वाघ यांचे म्हणणे आहे. त्यांनी या बाबत विभागीय आयुक्तांकडेही तक्रार केलेली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी चौकशी करण्याचे आदेशही दिले आहे.