Tuesday, May 17, 2022
No menu items!
HomeUncategorizedआधी पाणी द्या, नंतर न.प.चे कार्यालय उघडा पप्पू कागदेंच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे तीव्र...

आधी पाणी द्या, नंतर न.प.चे कार्यालय उघडा पप्पू कागदेंच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे तीव्र निदर्शने


बीड (रिपोर्टर) बीड नगरपालिकेकडून वेळेवर पाण्याचा पुरवठा केला जात नसल्याने शहरातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. पाण्याच्या प्रश्‍नावर रिपाइं आक्रमक झाली. आधी पाणी द्या, नंतरच नगरपालिकेचे कार्यालय उघडा, अशा घोषणा देत न.प. कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आहे.


बीड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या दोन्ही धरणात पाण्याचा मुबलक साठा असताना पंधरा ते वीस दिवसाला शहरवासियांना पाणी मिळत आहे. पाण्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत असून आधी पाणी द्या, नंतरच न.प.चे कार्यालय उघडा, असे म्हणत रिपाइंने आज न.प. कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. सदरील हे आंदोलन रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी राजू जोगदंड, किसन तांगडे यांच्यासह आदी रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिक

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!