Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडभारत राठोड यांच्या पार्थीवदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सैनिक भारत राठोड यांचा पार्थीवदेह...

भारत राठोड यांच्या पार्थीवदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सैनिक भारत राठोड यांचा पार्थीवदेह जिल्ह्यात


बीड/माजलगाव (रिपोर्टर) जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असणारा माजलगाव तालुक्यातील जवान आजारी असल्याने त्यास पुणे येथील कमांडो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता काल दुपारी या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्यावर असणारा बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्रावर मृत्यूने घाला घातल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आज दुपारी सदरील जवानाच्या पार्थीवदेहावर त्याच्या जन्मगावी बाराभाई तांडा (ता. माजलगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जवान भारत रामराव राठोड याचे पार्थीवदेह नगरहून बीडकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येते.

277676332 1004714043806945 4819306518279976216 n


माजलगाव तालुक्यातील बाराभाई तांडा येथील रामराव राठोड हे मध्यमवर्गीय आपल्या मुला-बाळांसह राहतात. थोडीफार शेती आणि मजुरी करून उदरनिर्वाह करतात. हालाखीच्या परिस्थितीत त्यांचा मुलगा भारत रामराव राठोड यास गेल्या काही वर्षात देश सेवेने प्रचंड ग्रासले होते. त्यामुळे भारत याने सैन्यदलात काम करण्याचे ठरवले, त्यासाठी त्याने २०१२ साली नागपूर सैन्यदलामध्ये परीक्षा दिली आणि तो भरतीही झाला. जम्मू काश्मीरमध्ये भारत राठोड कर्तव्य बजावत असताना गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी ते आजारी पडले. त्यांना उपचारार्थ पुणे येथील कमांडो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना भारत राठोड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी त्यांचा पार्थीवदेह पुणे येथून नगर आणि नगर येथून बाराभाई तांडा या ठिकाणी आणण्यात येणार होता. दुपारी दोनच्या नंतर भारत राठोड यांच्या पार्थीवदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी नगर येथून सैन्यदलाची एक तुकडी उपस्थित राहणार आहे. भारत राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!