Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईलोखंडीच्या वृद्धत्वमध्ये सातशे नेत्रशस्त्रक्रीयांचे उद्दीष्ट

लोखंडीच्या वृद्धत्वमध्ये सातशे नेत्रशस्त्रक्रीयांचे उद्दीष्ट


जिल्हा शल्यचिकीत्सक, डॉ. सुरेश साबळे, पद्मश्री डॉ. लहाने, डॉ. पारेख, डॉ. खैरे, करणार शस्त्रक्रीया,
रुग्णांची ने-आण, निवास व भोजनाचीही सोय

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शिबीर
बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयानंतर लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथे आरोग्य विभागाचे सर्वात मोठे रुग्णालये आहेत. या रुग्णालयांतर्गत या भागातील गरीब व गरजू रुग्णांना या रुग्णालयांचा उपयोग व्हावा आणि विविध आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जोमाने प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.


याचाच भाग म्हणून या ठिकाणी दि. १४ एप्रिल ते १७ एप्रिल या काळात भव्य नेत्रशस्त्रक्रीया शिबीर आयोजित केले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात सर्वाधिक शस्त्रक्रीया होणारे हे शिबीर ठरणार असल्याचा विश्वासही डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केला.
शिबीरात प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे हे रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रीया करणार आहेत. विशेष म्हणजे या शिबीरासाठी रुग्णांची ने – आण, त्यांची चहा, नाष्टा व भोजन व्यवस्थाही अंबाजोगाईच्या मानवलोक या सामाजिक संस्थेने केली आहे. या शिबीरासाठी लातूर येथील श्री. वळसे पाटील यांनीही मनुष्यबळ पुरविण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे डॉ. साबळे यांनी सांगीतले.
या शिबीरासाठी रुग्णांची रक्तदाब, साखर आदी प्राथमिक तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत सुरु करण्यात आली आहे. शिबीरासाठी आवश्यक त्या साधन सामुग्रींची पुर्तता रुग्णालयात करण्यात आली आहे. शस्त्रक्रीयागृह देखील अद्यायवत केल्याचे डॉ. साबळे म्हणाले. शिबीरासाठी आरोग्य विभागाच्या लातूर परिमंडळाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले नियमित लक्ष घालून आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन वेळा शिबीराच्या तयारीच्या बैठकाही झाल्या. बैठकीला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. एकनाथ माले, डॉ. सुरेश साबळे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, श्री. वळसे पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. अरुणा केंद्रे आदींची उपस्थिती होती. यावेळी तयारीचा आढावा घेऊन सर्व पाहणीही करण्यात आल्याचे डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले.
लोखंडीचे दोन्ही केंद्रांत रुग्णसेवा सुरळीत
दरम्यान, जिल्हा रुग्णालयानंतर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या अंतर्गत लोखंडी येथील वृद्धत्व आजार व मानसोपचार रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय या दोन मोठ्या आरोग्य संस्थांची उभारणी झाली. मागच्या वर्षी कोरोना काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण होऊन या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोरेानाच्या दोन्ही लाटांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना उपचार करण्यात आले. आता कोरोनाची लाट ओसरल्याने या ठिकाणी नियमित आरोग्य सेवा, शस्त्रक्रीया सुरु कराव्यात अशा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सुचना होत्या. त्यादृष्टीने त्यांनी शासन पातळीवरुन आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समिती व आपत्ती व्यवस्थापन निधीतून सर्व बाबींसाठी मुबलक निधी उपलब्ध करुन दिला. केज, धारुर व अंबाजोगाई ग्रामीण परिसरातील रुग्णांसाठी या दोन्ही आरोग्य संस्था संजीवनी ठराव्यात यासाठी या ठिकाणी विविध अद्यायवत आरोग्य उपकरणे, व्हेंटीलेटर्स, मुबलक औषधी साठा अशा सर्व बाबींची पुर्तता करण्यात आली आहे. दिल्याने या दोन्ही संस्थांमध्ये सर्व आवश्यक बाबींची पुर्तता करण्यात आली आहे. येथील स्त्री रुग्णालयातील शस्त्रक्रीयागृह सुरु होऊन महिलांवरील शस्त्रक्रीयांचे शिबीरही पार पडले. आता वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्रातही भव्य नेत्रशस्त्रक्रीया शिबीर होणार असल्याची माहिती डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!