Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमदोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर चोरीला

दोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर चोरीला


बीड (रिपोर्टर) दोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३१ मार्च रोजी सेलू अंबा येथील टोल नाक्याच्या पुढे काही अंतरावर अंबासाखर कारखान्याच्या उड्डाण पुलाच्या मागे घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.

अरुण हरीदास पवार (रा. अकोली ता. मोहळ जि. सोलापूर) यांनी आपला ट्रॅक्टर ३१ मार्च रोजी सेलुअंबा येथील टोल नाक्याच्या पुढे उभा केला होता. तो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. यामध्ये महेंद्र अर्जुन ६१५ कंपनीचे ट्रॅक्टरचे हेड (क्र. एम.एच. १३ पीआर २७०५) (किंमत अंदाजे ४ लाख) ट्रॉली (क्र. एम.एच. १३ टी. ९३१३) (किंमत १ लाख ५० हजार) तर दुसरी ट्रॉली (क्र. एम.एच. १३ टी. ९३१४) (किंमत १ लाख ५० हजार) असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

Most Popular

error: Content is protected !!