बीड (रिपोर्टर) एका मुकादमाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले रोख ६ लाख आणि सोन्याचे दागिने असा ६ लाख ३० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना काल रात्री अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्जे वस्ती वनवेवाडी (ता. आष्टी) येथे घडली. या प्रकरणी काल दुपारी अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रंभाजी बाबुराव गर्जे (वय ७०) या मुकादमाने आपल्या राहत्या घरी सहा लाख रुपये एका पेटीत आणून ठेवले होते. त्या पेटीत १० ग्रॅमची सोन्याची अंगठी होती. ते दुसर्या रुममध्ये झोपले असता अज्ञात चोरट्याने ४ एप्रिलच्या पहाटे त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी पेटीतील ६ लाख रुपये आणि एक सोन्याची अंगठी असा एकूण ६ लाख ३० हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गर्जे यांनी अंमळनेर पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठोंबरे हे करत आहेत.