बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल, डिझेलसह गॅसची सातत्याने दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून या दरवाढीच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय नवजवान सभेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी अनेक पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महागाई कमी करण्याचे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते, मात्र भाजपाची सत्ता आल्यापासून देशात महागाई वाढतच आहे. गॅस, पेट्रोल, खाद्यतेल यासह इतर वस्तूंचे भाव गगनाला भिडले. महागाईच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी भाऊराव प्रभाळे, ज्योतीराम हुरकुळे, नितीन रांजवण, संजय इंगोले, शेख सलीम, किशोर खेडकर, राहुल जगताप, प्रशांत दगडखेर, अंबादास आगे, फिडेल चव्हाण, आसाराम मुळे, करुणा टाकसाळ, देवीदास पवार, सुधाकर डोळस, रामहरी मोरे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.