बीड (रिपोर्टर) चौकात उभ्या असलेल्या चौघा जणांना भरधाव कारने उडवल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर चौकात घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता तर अन्य दोन जखमी झाले होते. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. गंभीर जखमी असलेल्या रमेश विठ्ठल फुलारी (वय ४७) यांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले.
घाटनांदूर चौकात उभे असलेल्या चौघा जणांना भरधाव वेगात आलेल्या कार (क्र. एम.एच.२० व्ही. २५१८) ने जोराची धडक दिली होती. या अपघातात वैभव सतीश गिरी (वय २८), लहु बबन काटुळे (वय ३०) या दोघांचा मृत्यू झाला होता. तर रमेश विठ्ठल फुलारी (वय ४७) आणि उद्धव निवृत्ती दोडतले (वय ५०) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासह कारमधील दोघांना मार लागला होता. या जखमींवर अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना रमेश विठ्ठल फुलारी यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले.