Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडयुवराज चरखा यांना एलआयसीचे एमडीआरटी आंतररष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

युवराज चरखा यांना एलआयसीचे एमडीआरटी आंतररष्ट्रीय पुरस्कार प्राप्त


बीड (रिपोर्टर) विमा सल्लागारांसाठी अत्यंत सन्मानाचा समाजाला जाणारा एम.डी.आर.टी. आंतररष्ट्रीय पुरस्कार बीडचे युवा विमा सल्लागार युवराज चरखा यांना मिळाला असून एका वर्षात पूर्ण करावयाचे हे लक्ष्य केवळ तीन महिन्यातच पूर्ण करून बीड शाखेचे र्धेीपसशीीं ऋरीीं ढीरलज्ञ च.ऊ.ठ.ढ. बनण्याचा मान मिळवला आहे.युवराज यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

एम.डी.आर.टी. म्हणजे विमा सल्लागारांसाठी जणू ऑस्कर किंवा नोबेलच मानला जातो . उत्कृष्ट ग्राहकसेवा देणार्‍या व चांगली व्यवसाय वृद्धी असणार्‍या विमा सल्लागारांनाच या परिषदेसाठी अमेरिकेला आमंत्रित केले जाते. अशाच विमा सल्लागारांच्या क्षेत्रात काही युवक आपला ठसा उमटवत आहे.यात बीडचे ईश्वर चरखा यांचे नाव आघाडीवर आहे त्यांनी एका वर्षात पूर्ण करावयाचे हे लक्ष्य केवळ तीन महिन्यातच पूर्ण करून बीड शाखेचे र्धेीपसशीीं ऋरीीं ढीरलज्ञ च.ऊ.ठ.ढ. बनण्याचा मान मिळवला आहे.अवघ्या चार वर्षांपूर्वी या क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या युवराजने करिअरच्या प्रत्येक वर्षी एम.डी.आर.टी.
या आंतरराष्ट्रीय सन्मानाला पात्र होण्याचा पराक्रम केला. आपल्या कामाविषयी
निष्ठा, मेहनत व ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देण्याचा सेवाभावी स्वभाव यांच्यामुळेच हे उत्तुंग यश त्याने संपादन केले. त्याच्या यशात जेष्ठ यशस्वी विमा सल्लागार असणारे वडील ईश्वर चरखा यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे याबरोबरच विकास अधिकारी अनुराग जैन यांचे मार्गदर्शन तसेच टीम अनुराग व बीड शाखा परिवारातील सर्वांचे सहकार्य ही मोलाचे आहे. त्याबरोबरच शाखा व्यवस्थापक रामप्रसाद राऊत सर व सहायक व्यवस्थापक गणेश औटी सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य यासाठी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच इन्शुरन्स वर्ल्ड मधील स्टाफ यांचे ही सहकार्य लाभले. या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे इन्शुरन्स वर्ल्डच्या ग्राहकांचे, परिवाराचे सुद्धा युवराज यांनी खूप खूप आभार मानले. व पुढेही या पेक्षा चांगले काम करण्याचा निश्चय व्यक्त .केला.

Most Popular

error: Content is protected !!