Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडमराठवाड्यात २ हजार १५५ कार्यकर्त्यांचा अन्नत्याग चालू

मराठवाड्यात २ हजार १५५ कार्यकर्त्यांचा अन्नत्याग चालू


बीड (रिपोर्टर) राज्य शासनाने तीनशे आमदारांना मुंबईत मोफत घरे देऊ नये, या उद्देशाने अन्नत्याग आंदोलन चालू आहे. यात मराठवाड्यात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. २१५५ कार्यकर्त्यांनी आज अन्नत्याग चालू केला आहे, अशी माहिती ऍड. अजित देशमुख यांनी दिली.

काही ठिकाणी प्रतिज्ञा घेऊन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकत्र बसून देखील या आंदोलनात सहभागी होताना दिसले. त्याच बरोबर अनेक कार्यकर्त्यांनी आपापली कामे करत हे आंदोलन चालू केले आहे. शासनाच्या निर्णयाच्या विरोधात अशा प्रकारचे आंदोलन पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे या अनोख्या आंदोलनाला कार्यकर्त्यांचा देखील उत्स्फूर्त असा पाठिंबा लाभला आहे. कार्यकर्त्यांना आपल्या ठिकाणी राहून अशा प्रकारे देखील काम करता येते, हे या निमित्ताने समजले आहे. शासनाने आमदारांना मोफत घर देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त ऍड. अजित देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!