Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडप्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, आत्महत्या करण्यापुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोघांचा उल्लेख

प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, आत्महत्या करण्यापुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोघांचा उल्लेख


गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
बीड (रिपोर्टर) सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून एका ५० वर्षीय शिक्षकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळी पालवण चौक परिसरात उघडकीस आला. आत्महत्या करण्यापुर्वी या शिक्षकाने तीन वेगवेगळ्या चिठ्‌ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत. त्या चिठ्ठीमध्ये त्रास देणार्‍या दोघांचा उल्लेख करण्यात आला. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी दुपारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

02 1


राहुल ईश्वर वाघमारे हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा आज सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. सदरील हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शिक्षकाच्या घरामध्ये सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये त्यांनी आपणास त्रास देणार्‍या प्राध्यापक बाळासाहेब लाखे व मुन्ना लोंढे या दोघांचा उल्लेख केला आहे. वाघमारे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे की, सर्व जनतेस पोलीस, डॉक्टर, समाज बांधव, मिडिया, सरकार शासन यांना जाहीरपणे सांगतो की, मी कसल्याही प्रकारची चोरी किंवा भ्रष्टाचार केलेला नाही, हा सर्व प्राध्यापक बाळासाहेब लाखे यांचा कट आहे. अशा बाबींचा उल्लेख या चिठ्ठीमध्ये करण्यात आला असून अन्य मजकूरही चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलेला आहे. ही चिठ्ठी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान वाघमारे यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चिठ्‌ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!