वाढत्या उन्हामुळे रक्तदान शिबीर कमी झाले
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज 30 ते 35 बॅग रक्त लागत असते. हे रक्त रक्तदान शिबिरातून उपलब्ध होत असते, मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी रक्तदान शिबीर घ्यावे व रक्ताचा तुटवडा भरून काढावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी केले आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे रक्तदान शिबीर कमी झाले, दररोज 30 ते 35 बॅग रुग्णांना रक्त द्यावे लागते. रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांचे नातेवाईक इकडून-तिकडून रक्ताची बॅग उपलब्ध करत असतात. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी केले आहे. दरम्यान सिझर, थॅलेसेमियाच्या रुग्णांना जास्त प्रमाणात रक्त लागत असते. ऐनवेळी रक्त उपलब्ध झाले नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत असते. हिवाळ्याच्या दरम्यान रुग्णालयात रक्ताचा मुबलक साठा असतो. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो.