बीड (रिपोर्टर)‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने भारतीयांची मोठी फसवणूक केली आहे. प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असून बुरे दिन दाखवण्याचे काम या सरकारने केले आहे. महागाई कमी करावी, वाढलेल्या महागाई विरोधात बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
भाजपाने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. महागाई गगनाला भिडली असून रोज दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याविरोधात आज बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. या वेळी बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गणेश बजगुडे यांची उपस्थिती होती. हे निदर्शने खा. रजनीताई पाटील, बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.